ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द _ राजेश्वर कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीकरीता निवडणुक घेणेबाबत जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांनी प्रारूप मतदार यादी दि. २१.०४. २०२५ रोजी प्रसिध्द केलेली आहे. सदर मतदार यादीमध्ये दावे/हरकती/आक्षेप दाखल करण्याचा कालावधी दि. २१.०४.२०२५ ते ३०.०४.२०२५ पर्यंत असून आक्षेपावरील हरकती करीता सुनावणी दि. ०७.०५.२०२५ रोजी होणार असून दि. १३.०५.२०२५ ते दि. १४.०५.२०२५ या कालावधीमध्ये आक्षेपाचाबत निर्णय देण्यांत येणार असून अंतीम मतदार यादी दि. १६.०५.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यांत येणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांनी कळविले आहे. याबाबत वर्तमानपत्रात प्रारूप मतदार यादी अंतीम करणेचा कार्यकमाची जाहीरात प्रसिध्द करण्यांत आलेली आहे.

सदर प्रारूप मतदार यादी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रमुख कार्यालय व तालुका शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था चंद्रपूर व जिल्हयातील सर्व सहाय्यक निबंधक कार्यालयातील नोटीस बोर्डावर दि. २१.०४.२०२५ रोजी लावण्यांत आलेल्या आहेत. असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर कल्याणकर यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये