ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी ‘स्वागत कक्ष’ कार्यान्वित

तत्पर सेवेसाठी महावितरणचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

     चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व औदयोगिक वीज ग्राहकांसाठी (चंद्रपूर, बल्लारशा व वरोरा विभाग मधील ग्राहकांसाठी )विद्युत भवन, बाबुपेठ रोड चंद्रपूर, येथे जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र ‘स्वागत कक्ष ‘ कार्यान्वित करण्यात आले आहे.मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन पार पडले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, कार्यकर्ते अभियंता प्रशासन श्री. विजय राठोड, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चंद्रशेखर दारव्हेकर, श्री. दिलीप वावरे हे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नविन वीज जोडणीसह वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारीचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी ‘स्वागत कक्ष’ तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील औदयोगिक ग्राहकांनी महावितरणच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

         महावितरणच्या महसुलाचा औद्योगिक ग्राहक हा प्रमुख स्रोत आहे. तसेच औद्योगिक वीज ग्राहकांकडून नियमित आणि वेळेत विजबिल भरणा करण्यात येत असल्यामुळे महावितरणचे अर्थचक्र चालण्यास मदत होते. ‘स्वागत कक्षामुळे’ औद्योगिक ग्राहकांना वीजसेवा व तक्रारींसाठी स्थानिक कार्यालयाऐवजी आता थेट *मंडल* स्तरावर संपर्क साधता येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक कार्यालयांच्या औद्योगिक ग्राहकसेवांसाठी या कक्षाकडून समन्वय व दैनंदिन देखरेख राहणार आहे.

‘स्वागत कक्ष’ संपर्क क्रमांक व ईमेल :-

    जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ *स्वागत कक्षा ‘* ला संपर्क करण्यासाठी औद्योगिक वीज ग्राहकांसांठी ७८७५७६१००८ व ७८७५७६१०१४ हे संपर्क क्रमांक आणि swagatcell_chandrapur @mahadiscom.in ईमेल आय डी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘स्वागत कक्षा’ ची कार्यपध्दती :-

         ‘स्वागत कक्षा’ चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता प्रशासन व व्यवस्थापक (वित्त व लेखा) काम पाहणार आहे. या कक्षाकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहक दारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा दिली जाणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये