ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रशासन व राधा ऑर्गनायझेशन संस्थेच्या संगनमताने तालुक्यातील ग्रामसभेंना करोडोचा चुना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
गेल्या एक ते दोन वर्षापासून ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सामूहिक वन हक्क समितीच्या समस्या वाढताना दिसत असताना आणि वारंवार प्रशासनाला ग्रामसभेद्वारे लेखी निवेदन तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही आहे आणि राधा ऑर्गनायझेशन नावाची संस्था चुकीची माहिती देऊन बोगस मस्टर काढून वृक्ष न लावता खोटे बिल जोडून शासनाची दिशाभूल करत बिलांची उचल करीत आहे यामध्ये वायगाव गावाची समस्या गेल्या एक वर्षापासून शासन दरबारी पडलेली आहे ज्याचा न्याय अजून पर्यंत मिळालेला नाही त्याच प्रकारे चांदगाव धामणगाव आता चोरटी बोदरा असे एक नव्हे तर ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये ज्या ज्या गावांमध्ये सामूहिक वन हक्क समिती द्वारे वृक्ष लागवड केलेली आहे.
खास करून ज्या गावांमध्ये राधा ऑर्गनायझेशन ही संस्था मार्गदर्शक आहे त्याच गावामध्ये जातीय भांडण होऊन समाजात फूट पडलेली आहे आणि ही फूट पाडून त्या त्या गावांमध्ये बोगस मस्टर झाड न लावता देयक अदा करणे बोगस सया घेऊन ग्रामसभा दाखवणे असे एक ना अनेक प्रकार संपूर्ण तालुक्यामध्ये घडत आहे आज एका चोरटी गावाचा विचार केला तरी त्या गावांमध्ये 50 ते 60 लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही बोदरा या गावी भेट दिली असता असे लक्षात आले की गेल्या दोन वर्षापासून त्या गावांमध्ये वृक्ष लागवडीचा काम सुरू आहे परंतु आज पर्यंत झाड जमिनीच्या वर आलेले नाहीत शेवगा या झाडाची विशेषता नऊ महिन्यांमध्ये तो झाड फळ देतो पण गेल्या दोन वर्षांपासून संबंधित झाड दोन फूट पण उंचावर गेलेला नाही मग प्रशासन करते तरी काय प्रशासनाचा इथं हात असल्याशिवाय आणि सामुहीक वन हक्क समिती व राधा ऑर्गनायझेशन या दोन्ही मिळून ग्राम ग्रामसभेला लुटण्याचा जो गोरखधंदा चालवलेला आहे.
यावर दिनांक 23 तारखेला होणाऱ्या जनसुनावनामध्ये कारवाई होणार का रोजगार हमी यंत्रणेअंतर्गत संपूर्ण तालुक्यातील भ्रष्टाचार उघडकीस येऊन दोषी समित्या ददोषी अधिकारी व त्यांना मार्गदर्शन करणारी संस्था यावर त्वरित शासनाने कायदेशीर कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे संस्था व समितीवर शासनाची दिशाभूल करून पैशाची अपरातपर केली म्हणून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व ग्रामसभेची होणारी लूट थांबविण्यात यावी