ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आधी शेत जमिनीला योग्य मोबदला, पुनर्वसन नंतरच मोजणी : सरपंच संगीता देहारकर यांची पत्र परिषदेत माहिती

अरविंडो कोळसा खान प्रकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

               तालुक्यातील बेलोरा आणि परिसरातील गावाचे पुनर्वसन आणि संपूर्ण जमिनीची खरेदी न करता कोळसा उत्खनन सुरू करीत असलेल्या अरविंद रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे शासकिय जमीन मोजणी करण्याच्या कामास गावकऱ्यांचा विरोध असल्याचे सरपंच संगीता देहारकर यांनी पत्र परिषदेत सांगितले. यावेळी असंख्य गावकरी उपस्थित होते.

 आधी गावाचे पुनर्वसन, शेतजमीनी व घरांना योग्य मोबदला द्या अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी डागा आणि आता अरविंडो या नावाने कार्यरत रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने डागा कंपनीच्या पूर्वीच्या जागेवर कोळशाचे उत्खनन करून विक्री सुरू केली आहे. आता या खाणीच्या विस्तारासाठी त्यांना इतर शेतजमिनी आणि गावाची आवश्यकता आहे. गावकरी आणि कंपनी यांच्यात जिल्हाधिकारी यांचे समक्ष अनेक बैठका झाल्यात पण योग्य मोबदल्यावर तोडगा निघाला नाही. आता प्रकल्पग्रस्तांवर शासकीय जमिनीच्या मोजणीच्या माध्यमातून दबाव आणून पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा घाट कंपनीने घातला आहे. आतापर्यंत ४ वेळा मोजणीस गावकऱ्यांनी विरोध केला. ग्रामसभेचा ठराव घेऊन आधी पुनर्वसन, शेत जमीन व घरांना योग्य मोबदला असा ठराव सर्वानुमते घेण्यात आल्याचे सरपंच देहारकर यांनी सांगितले. दि. ६ मार्चला होणाऱ्या मोजणीचे पत्र आदल्या दिवशी म्हणजे दि.५ मार्चला रात्री हनुमान मंदिरात लावल्याचे सांगितले.

तसेच मोजणी लगतच्या ९७ मालमत्ता धारकांना सुद्धा प्रत्यक्ष मोजणीस हजर राहण्याचे पत्र देण्यात आले नाही. पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यासाठी आल्यास त्यास आमचा विरोध आहे. जर जबरदस्तीने मोजणी केल्यास आम्ही आमरण उपोषणास बसून याकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधू असे सरपंच संगीता देहारकर यांनी शेवटी सांगितले. यावेळी पानवडाळा सरपंच प्रदीप महाकुलकर,बंडू आगलावे, प्रशांत मत्ते,विकास पंडीले,प्रवीण मत्ते,विठ्ठल पूनवटकर, प्रदीप काकडे, बंडू गाडगे, शेषराव मत्ते,नितीन सातपुते, नंदकुमार कायरकर, प्रवीण ठोंबरे यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये