ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माऊंट सायन्स ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी जिल्हास्तरीय कला महोत्सवात चमकले

सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 – चंद्रपूर येथे झालेल्या चंद्रपूर जिल्हास्तरीय कला महोत्सवात माऊंट सायन्स ज्युनियर कॉलेजच्या अवंती अमोल दुधे आणि हर्षद प्रशांत चरडुके, साओली या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.

माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लपलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी देशभरात कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. चंद्रपूर जिल्हास्तरीय कला महोत्सवाचे आयोजन मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बाबूपेठ, चंद्रपूर येथे करण्यात आले. माऊंट सायन्स ज्युनियर कॉलेज, साओली येथील दोन विद्यार्थ्यांनी या कला महोत्सवात सहभाग घेतला. अवंती अमोल दुधे हिने पारंपारिक नृत्य स्पर्धेत भाग घेऊन प्रथम पारितोषिक पटकावले. हर्षद प्रशांत चारडुके याने एकपात्री प्रयोग स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले.

दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढील नागपूर विभागीय स्तरावरील कला महोत्सवासाठी त्यांची निवड करण्यात आली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रफुल्ल जी.रामटेके व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये