ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चकपीरंजी गावात जिल्हाधिकारी यांची भेट

अनिल स्वामी यांच्या गांडूळ खत युनिटची केली पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली – डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक मिशन योजने अंतर्गत अनिल स्वामी यांच्या शेतात तयार करण्यात आलेली गांडूळ खत युनिटला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देत गांडूळ खत, व्हार्मिवाश , बी डी कल्चर , सीपीपी कल्चर ची पाहणी केले. या युनिटचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.

    कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2024 25 अंतर्गत सावली तालुक्यात डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीमिशन योजना राबविले जात असून त्यात 636 लाभार्थी 500 हे क्षेत्रावर नैसर्गिक शेती करीत असून त्यात सदर योजने अंतर्गत शेतकरी याना वेळोवेळी नैसर्गिक शेती बाबत निविष्ठा निर्मिती बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच सदर योजने अंतर्गत साईश्रेया शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यात आले असून सदर शेतकरी उत्पादक कम्पनीत योजनेतील शेतकरी भागधारक असून कम्पनी अध्यक्ष अनिल स्वामी हे एक प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या शेतात 30 बेड चे गांडूळ खत युनिट उभारणी केले असून त्यांनी सदर योजने अंतर्गत बी डी कल्चर ,सीपीपी कल्चर तयार केले आहे.

अनिल स्वामी यांनी सदर वर्षाला गांडूळ खत मधून जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न केले तसेच त्यांनी रेड राईस,व्हर्मीवाश हे सुद्धा बाजारात उपलब्ध करून दिले आहे .प्रीती हिरळकर प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर , चरडे उपविभागीय अधिकारी मूल,प्रांजली चिरडे तहसीलदार सावली,योगेश गाडे गट विकास अधिकारी सावली,ललित राऊत तालुका कृषी अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित असून सदर भेटी मध्ये जास्तीत जास्त शेतकरी यांनी नैसर्गिक शेती करीत जमिनीचे संवर्धन करावे असे मत जिल्हाधिकारी महोदय यांनी मांडले.

सदर भेटी मध्ये काही निवडक व होतकरू शेतकरी याना गांडूळ खताचे बॅग,जैविक निविष्ठा व स्प्रे पंप वाटप करण्यात आले. काही वर्षात चेकपिरंजी गाव नैसर्गिक शेतीमय व्हावे असे त्यांचे प्रयत्न सुरु असून त्याकरिता ते नेहमी जास्तीत शेतकरी याना नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन करीत असतात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये