ताज्या घडामोडी

पोस्को च्या आरोपीला राजस्थानातून घेतले ताब्यात – वर्षभरापासून आरोपी होता फरार

अल्पवयीन मुलीवर वर्षभरापूर्वी केला होता लैंगिक अत्याचार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

नंदु गुड्डेवार, ब्रम्हपुरी

वर्षभरापूर्वी ब्रह्मपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे उघड झाले होते. मात्र प्रकरणातील आरोपी जितेश रामबाबू जागा हा पोलीस तक्रार होताच फरार झाला होता. सदर प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनी पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला होता हे विशेष.

प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा शोध न लागल्याने अखेरीस त्यांनी ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले मात्र वैद्यकीय तपासणीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी जितेश रामबाबू जागा ह्याच्या विरुद्ध भादंवि 363, 376 (2) (एन.) आयपीसी 4, 6 पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र दरम्यान आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

गुन्ह्यातील आरोपी  बाबत आरोपीची शोधाशोध सुरू होती. अखेर राजस्थान राज्यातील जयपूर येथून आरोपी जितेश रामबाबू जागा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवार दि. 23 फेब्रुवारीला त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.

ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू ठेवले होते. यादरम्यान पोलिसांना आरोपी राजस्थान राज्यात जयपूर येथे असल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने जयपूर येथे जाऊन आरोपीला राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. त्याला जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर येथे हजर करून त्याची कोठडी घेण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, पो. नि. अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर, पो. हवा. योगेश, संदेश, मुकेश, शिल्पा ह्यांच्या पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये