ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

-गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे,सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,एमसीव्हिसी विभागाच्या प्रमुख प्रा. आरजू आगलावे, प्रा नंदा भोयर आदि मान्यवर उपस्थित होते, सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याबद्दल माहिती दिली, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा बाळु उमरे यांनी केले कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये