ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रभारी ग्रामसेवकांनी केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार

टेकामांडवा येथील प्रभारी ग्रामसेवकांचा अजब प्रकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

 प्रभार काढण्यासाठी शुभांगी राऊत यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी

जिवती :- तालुक्यातील ग्रामपंचायत टेकामांडवा येथील सध्याचे प्रभारी ग्रामसेवक विवेक तितरे यांच्याकडे असलेला ग्रामसेवक पदाचा प्रभार काढून घेणे व त्यांनी केलेल्या व्यवहाराची रीतसर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी टेकामांडवा ग्रामपंचायतच्या सरपंच शुभांगी राऊत यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

शुभांगी राऊत यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, टेकामांडवा ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक विवेक तितरे ग्रामपंचायतमध्ये विविध योजनेतून लाखो रुपये परस्पर उचल केल्याचा आरोप त्यांनी केला असून या संदर्भात त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी.तसेच तितरे यांनी सरपंच शुभांगी राऊत यांची डिजिटल सही नंबर ऍड करतो म्हणून त्यांच्याकडून घेतली व ती चार महिन्यापासून वापस केली नाही.

व सदर डिजिटल सहीची कसल्याही प्रकारची माहिती न देता ते परस्पर व्यवहार करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच शुभांगी राऊत यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये