ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयसीएसई बोर्डात शहरातून एंजल खरतड प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

 बल्लारपूर:- बल्लारपूर तहसीलमधील एकमेव आयसीएसई अभ्यासक्रम असलेल्या वियानी ज्युबिली स्कूलचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००% निकाल लागला आहे. एकूण ३४ विद्यार्थ्यांनी १०वी बोर्डाची परीक्षा दिली आणि सर्व उत्तीर्ण झाले. एंजल अनिल खरतड हिने ९३.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली.

    शाळेतील रोहित के. मेश्राम याला ९२.८०%, दिशा डी. शुक्ला ८८.८०%, आरजु एस. अलिखान ८८%, श्याम एस.चापले याला ८७.२०% गुण मिळाले. शाळेचे व्यवस्थापक फादर बेन्नी आणि प्राचार्य फादर जोसेफ यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    एंजल खरतड ही माजी नगरसेविका कविता खरतड तसेच माजी नगरसेवक अनिल खरतड यांची मुलगी आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये