ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी कोरपणा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा! 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  स्कॉलर्स सर्च अकॅडेमी कोरपणा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात ,देशभक्तीपर वातावरणात संपन्न झाला.

शाळेचा परिसर तिरंग्याच्या थाटात सजवण्यात आला होता.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सर्च फाउंडेशन संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडमी अँड जुनिअर कॉलेज चे संस्थापक- अध्यक्ष इंजिनियर दिलीप झाडे, शंकरराव देवाळकर – अध्यक्ष ज्ञानगंगा नित्यानंद सेवा संस्था – कोलांडी -जिवती,बळीभाऊ हेपट- सचिव ज्ञानगंगा नित्यानंद सेवा संस्था- कोलांडी -जिवती, नंदाताई देवतळे गडचांदूर, शुभांगी ताई हेपट गटचांदूर संजय ठावरी, सेवानिवृत्त प्राचार्य- वसंतराव नाईक कोरपणा, संतोष झाडे,अनिल वडस्कर, धर्मराज पारखे, प्राचार्य – राहुल उलमाले इत्यादी मान्यवर,पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

इंजिनियर दिलीप झाडे यांनी ध्वजारोहण केले. सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली. स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सलामी दिली. ध्वजारोहणानंतर प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले त्यामध्ये देशभक्तीपर गीत, नृत्य इत्यादींचा समावेश होता. प्रमुख पाहुणे यांनी एकता, देशभक्ती, शांतता आधी मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इंजिनीयर दिलीप झाडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. करिश्मा बागडे यांनी प्रास्ताविकेत शाळेची सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग बारावीची विद्यार्थिनी कुमारी दिपाली तोडासे व हिमांशू चौधरी यांनी केले. ‘वंदे मातरम’या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये