ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरगुती भांडणातून कुऱ्हाडीने प्राणघातक हमला 

३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

घरगुती भांडणातून कुऱ्हाडीने प्राणघातक हमला होऊन २ जण जखमी झाल्याची घटना देऊळगाव राजा येथील रहेमत नगर येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की,

 फिर्यादी असलम शहा खलील शहा रा साखरखेर्डा व त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरुन मागील तिन वर्षापासुन भांडण झगडा असुन दिनांक 07/09/2024 रोजी फिर्यादीचे सासरे यांनी फोनवर फिर्यादी यांना त्याचे पत्नी व मुलास भेटण्यासाठी देउळगावराजा येथे बोलावले असता आरोपी निझाम शहा महेमुद शहा, अतीक शहा निझाम शहा, व अदील शहा निझाम शहा सर्व रा रहेमतनगर, देऊळगाव राजा यांनी संगणमत करुन फिर्यादी चा भाउ अफजल शहा यास आरोपी ने कु-हाड डोक्यात मारुन जख्मी केले. उजव्या हाताचे कोणीवर मारुन जखमी केले. फिचे वडील खलील शहा यांना आरोपी ने काठीने मारहाण करुन शिवीगाळ केली व जिवाने मारण्याच्या

धमकी दिली,पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नायबराव मोगल करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये