विधानसभा निवडणूक संदर्भात पत्रकार परिषद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माननीय उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व पत्रकार यांचे तहसील कार्यालय निवडणूक सभागृहात आज दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली.
24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघ बाबत तालुका निहाय माहिती देण्यात आली त्यामध्ये सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली,लोणार तालुक्यातील गावांबाबत माहिती सांगण्यात आली, मतदार लोकसंख्या बाबत सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या बाबत तालुका निहाय माहिती सांगण्यात आली.
तसेच सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये असलेली मतदार संख्या,पुरुष,महिला,इतर स्त्री-पुरुष प्रमाण बाबत माहिती देण्यात आली. मतदार संख्या अंतिम झाल्यानंतर काही प्रमाणात वाढतील, सध्या आपल्याकडे सर्विस वोटर सैनिक क्षेत्रातील कर्मचारी,85 वर्षे वयांचे व्यक्ती, दिव्यांग मतदार इत्यादी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
24 सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये असलेले मतदान केंद्रा बाबत तालुक्यातील ग्रामीण भाग, शहरी भाग यामध्ये एकूण किती मतदार केंद्रे आहेत याबाबत माहिती सर्वांना देण्यात आली. सर्व मतदार केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी मतदान पथक कर्मचाऱ्यांचे नियुक्ती बाबत माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.
तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी योजना व्यवस्था करण्यात आली आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे वाहन,प्रचार सभा रॅली करिता परवानगी देण्यात येणार आहे, यासाठी लागणारे संमती पत्र, जागा मालक,वाहन मालक,चालक यांची आवश्यक कागदपत्रे रॅली काढण्यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक आहे.
आदर्श आचारसंहिता पथक यांच्यासाठी FST, VST, SST, VVT टीम ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक संदर्भातील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आले आहे, सर्व कर्मचारी अधिकारी यांचे सहकार विद्या मंदिर सिंदखेडराजा येथे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे, दिव्यांग मतदारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आले आहेत तसेच शौचालय पिण्याचे पाण्याची व्यवस्था याबद्दल ही मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात येणार आहे याबद्दल सरांनी माहिती दिली.
निवडणुकीबाबत माननीय सरांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत जसे की दारूबंदी, गाड्यांमध्ये येणारा पैसा याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याकरिता स्वीप पथक नियुक्त करण्यात आले आहे, तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी गावनिहाय काही उपक्रम राबवता येतील का याचा सुद्धा सरांनी आढावा घेतला.
आजच्या सभेला मा. तहसीलदार सिंदखेडराजा श्री. अजित दिवटे, मा. तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंदखेडराजा तुषार जाधव,मा. नायब तहसीलदार प्रवीण वराडे,अंकुश म्हस्के नोडल अधिकारी प्रसार माध्यम, प्रकाश शिंदे सहाय्यक नोडल अधिकारी प्रसारमाध्यम, संजय सोनुने उपस्थित होते.
पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकार बांधवांनी काही सूचना प्रा. खडसे सरांना सांगितल्या. तसेच पत्रकार बांधवांना अजून काही सूचना असल्यास तसेच निवडणूक संबंधी नव्या येणाऱ्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचतील याची दखल घेण्यात येईल असे कळविले.