ताज्या घडामोडी

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

शासनाच्या डोळ्यात धुळ झोकुन अवैध रेती तस्करी सुरूच

चांदा ब्लास्ट –

अतुल कोल्हे भद्रावती.
तालुक्यातील चारगाव येथील वर्धा नदी घाटावरून रेतीची अवैध तस्करी करीत असलेल्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे दिनांक २६ रोज शुक्रवारला रात्री सात वाजताच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत अवैध रेतीने भरलेले ट्रॅक्टर महसूल विभागाद्वारे ताब्यात घेण्यात आले आहे. सदर ट्रॅक्टर हे तालुक्यातील चारगाव येथील वर्धा नदीवरून अवैधपणे रेती भरून भद्रावती शहराकडे येत होते.याची माहिती महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी अनिल दडमल व तलाठी मस्के यांनी विंजासन रोडवर या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन ट्रॅक्टरला तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे. सध्या भद्रावती शहर व तालुक्यात रेती तस्करीला उधान आले असून गौण खनिज पथकाद्वारे अवैध रेती तस्करांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र त्यांच्या डोळ्यात धुळ झोकुन अवैध रेती तस्करी सुरूच आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये