ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘एक्लॅट ऑफ एक्सलन्स’ प्रदर्शनीत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन

चांदा ब्लास्ट

 इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये ‘एक्लॅट ऑफ एक्सलन्स: ए शोकेस ऑफ लिमिटलेस लर्निंग’ या शिर्षकांतर्गत एका विविधांगी प्रदर्शनीचे शनिवारी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांतील प्रतिभा आणि कौशल्याचे प्रदर्शन केले.

 प्राचार्य सीमा एम. जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे विषय निवडून, त्यांची जिज्ञासा आणि आवड प्रतिबिंबित करणारे मॉडेल सादर केले. प्रदर्शनीमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, सामाजिक विज्ञान, गणित, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कला आणि हस्तकला, संगीत आणि नृत्य, आणि क्रीडा यांसाठी वेगवेगळ्या खोल्या होत्या. प्रत्येक खोलीमध्ये मॉडेल्सची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर करण्यात आल्या होत्या.

 प्रदर्शनीचा केंद्रबिंदू निःसंशयपणे पूर्व-प्राथमिक वर्गांचे मॉडेल होते, जेथे नर्सरी, एलकेजीआणि युकेजीच्या विद्यार्थ्यांनी यमक आणि कथांपासून ते गणितीय आकडेमोड आणि शिकवण्याच्या तक्त्यांपर्यंतचे मॉडेल प्रस्तुत करून अभ्यागतांना आश्चर्यचकित केले.

 डॉ. पूनम सुहाग यांनी या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन केले, प्रियंका पुगलिया आणि विनय भंडारी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. या तिघांनी संपूर्ण प्रदर्शनीचे निरीक्षण केले आणि प्रत्येक मॉडेलचे वैशिष्टय़े समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रदर्शनीतील उत्कृष्ट मॉडेल्सचे कौतुक केले तसेच प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांची दखल घेतली.

 प्रदर्शनीला पालकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पालकांनी प्रत्येक विषयाच्या खोलीला भेट देत तिथे मुलांच्या ज्ञान क्षमतेचे मूल्यमापन करीत कौतुक केले. कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

 इंदिरा गांधी गार्डन स्कूलचे ‘एक्लॅट ऑफ एक्सलन्स’ हे प्रदर्शन शाळेच्या सर्वांगीण शिक्षणाच्या वचनबद्धतेचा दाखला देणारे ठरले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये