ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात भक्तिमय वातावरणात निघाली रथयात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अयोध्येत प्रभू श्रीराम च्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्या अनुषंगाने देऊळगाव राजा शहरात 21 जानेवारी ला प्रभू श्रीराम ची मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात रथयात्रा काढण्यात आली, हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त या रथयात्रा मध्ये सहभागी झाले होते, श्री राम जय राम जय जय राम, व जय श्रीराम च्या घोषणा नी व प्रचंड आतिषबाजी ने शहर दणाणून गेले होते,सगळीकडे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते, वाल्मीकी नगर येथील श्रीराम मंदिर पासून रथयात्रा सुरु करण्यात आली.

शहराच्या प्रमुख मार्गाने भ्रमण करीत समारोप माळीपुऱ्यातील श्री राम मंदिरात करण्यात आला,या रथ यात्रेतील बजरंग बली ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, अकोट येथील देवेंद्र थोरात यांनी बजरंग बली ची भूमिका साकारली, बजरंग बली ची वेशभूषा धारण करून हातात गदा घेऊन श्रीरामाचा मी सेवक आहे हे दाखवून दिले,प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या सजीव देखाव्यानी वातावरणात रंगत आणली, या रथयात्रा मध्ये 21 दिंड्या सहभागी झाल्या होत्या,ठीक ठिकाणी दानशूर व्यक्ती कडून चहा,पाणी,नास्ता ,फळ वाटप करण्यात आले,या रथयात्रेत आमदार डॉ राजेंद्र शिंगणे,माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ गणेश मांटे, डॉ सुनिल कायंदे,काँग्रेस पक्ष नेते मनोज कायंदे,गोपाळ व्यास,राजेश भुतडा,ब्रिजमोहन मल्लावत,निलेश अग्रवाल,दीपक मल्लावत,बिपीन मल्लावत,संतोष खांडेभराड,राजू काबरा, सह अनेक श्रीराम भक्त सहभागी झाले होते, शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये