ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन.सी.सी.च्या प्रशिक्षणातून समर्पण व देशभक्ती निर्माण होते – खासदार रामदास तडस 

75वा एन.सी.सी. दिन सोहळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘आज तरूण तरुणींना योग्य मार्गदर्शन व चांगले संस्कार देण्याची नितांत गरज असून या दृष्टिकोनातून एन.सी.सी.च्या प्रशिक्षणातून समर्पण व देशभक्ती निर्माण होते, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयात संपन्न झालेल्या 75 व्या एन.सी.सी. दिन समारंभात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना 23 जानेवारी रोजी खासदार रामदास तडस यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल मुरूगेशन, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, यशवंत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक मृदुला हिवंज, रोव्हर लिडर संतोष तुरक व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र प्रदान करून झाले. या प्रसंगी सेरेमोनिअल परेडचे शानदार संचलन झाले. परेडचे नेतृत्व सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर याने केले. मुलांच्या प्लाटूनचे नेतृत्व सार्जंट अक्षय जबडे व प्रतीक क्षीरसागर यांनी तर मुलींच्या प्लाटूनचे नेतृत्व अंडर ऑफिसर राखी खोडे हिने केले.

या प्रसंगी 37व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळावा यशस्वी करण्याकरीता मिळालेल्या सहकार्याकरीता यशवंत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक मृदुला हिवंज व सृजन काॅन्हेंटचे स्काऊट शिक्षक अनुप चिंचपाले यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

एन.सी.सी.बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल मुरूगेशन यांना निवृत्तीबददल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 2023-24चा ‘उत्कृष्ट कॅडेटस”चा पुरस्कार सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अक्षय जबडे, प्रतीक क्षीरसागर, राखी खोडे, वैष्णवी शिरभाते व प्रशिल अंदुरकर यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले. सूत्रसंचालन सार्जंट वैष्णवी शिरभाते हिने तर प्रा जगदीश यावले यानी आभार मानले.

एन.सी.सी. दिन सोहळा पाहण्याकरीता यशवंत कन्या विद्यालय व सृजन शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येत उपस्थित होते.

यशस्वीतेकरीता आसीफ शेख, योगेश आदमने, संकेत हिवंज, प्रा. मेघा फासगे यांच्यासह एन.सी.सी.छात्र सैनिकांनी

कार्यक्रमाची सांगता ‘हम सब भारतीय है……….’ या एन.सी.सी. गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये