Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे कृष्णजन्माष्ठमी निमित्त चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाची भुमिका

चांदा ब्लास्ट

बालपणात केलेले संस्कार ओल्या मातीवर केलेल्या कलाकृती प्रमाणे असते. त्यात मैत्रीतला निस्वार्थीपणा आणि समानतेचे संस्कार मुलांच्या कोमल मनावर रूजवण्यासाठी कृष्णजन्माष्टमीच्या अनुशंगाने प्ले स्कूलच्या चिमुकल्यांकरिता वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने आणि अतिथींच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे आणि प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे लाभले. या स्पर्धेत चिमुकल्यांनी राधा, कृष्ण तर त्यांच्या पालकांनी नंद, यशोदा व ग्वाल्यांची भूमिका बजावली होती.

चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या पालकांचे व चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणा-या आई-वडिलांचे अभिनंदन केले.

ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका पुजा मिश्रा तर आभार प्रदर्शन शिक्षिका श्वेता मच्छा यांनी केले. उत्कृष्ठ विजेता निवडण्याचे व पारितोषीक वितरणाचे कार्य परिक्षकांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाची भुमिका बजावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये