ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून गडचांदूर वासीयांना शोकसभागृह हस्तांतर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ ही समाजाच्या विकासा करिता चारही बाजूने विचार करीत असते. त्याकरिता आजूबाजूच्या गावांमध्ये विकास कामे आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमाद्वारे राबवत आहे, यावेळी गडचांदूर शहरातील नागरिकांचा विचार करीत त्यांनी गडचांदूर येथील मुक्तीधाम येथे 114 चौ. मी. लांबीचे शोकसभागृह, महिला व पुरुष प्रसाधान गृह आणि प्रवेशद्वार यांचे बांधकाम करून त्यास नगरपरिषद गडचांदूर ला नागरिकांच्या सेवेसाठी हस्तानंतरण केलेत. अंत्यसंस्कार केल्या नंतर शोकसभा घेतली जाते त्यावेळेस उन्, पाऊस आणि वारा या पासून अंत्यविधीला उपस्थित नागरिकांचे संरक्षण व्हावे व प्रसाधनाची व्यवस्था असावी हा त्या बांधकामा मागचा उद्देश आहे.

या बांधकामामुळे अंत्यविधीला आलेल्या नागरिकांचा त्रास कमी होणार असे नगरपरिषद गडचांदूर ने मत व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये