ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात स्वामी विवेकानंद तथा राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दिनांक 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद तथा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम या दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.

त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून स्वामी विवेकानंद तथा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याचे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वामी विवेकानंद तथा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रस्ताविक ज्योती चटप यांनी तर आभार कुमारी भुवनेश्वरी गोपमवार यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेश पाटील, बावनकर, मांढरे, जी एन बोबडे, मरसकोल्हे, कुमारी शेंडे, माधुरी उमरे, कोंगरे, आत्राम, आडे, किनाके, मेश्राम, लीलाधर मते, शशिकांत चन्ने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये