ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिणाबाई विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील बहिणाबाई विद्यालय नोकेवाडा येथे १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तर राजमाता जिजाऊ यांची जयंती सुद्धा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील सहा. शिक्षक सतीश राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून नंदेश्वर खोब्रागडे, छत्रपती काटकर, संतोष इंद्राळे आदी होते.

सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. प्रास्ताविकेतून छत्रपती काटकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व जिजाऊ वंदना सादर केली. सदर कार्यक्रमामध्ये राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा वर्ग ८ वीची विध्यार्थीनी कु.आयुषा हिने सादर केली. प्रमुख अतिथी नंदेश्वर खोब्रागडे यांनी राजमाता जिजाऊ नसत्या तर आज हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते काय व स्वामी विवेकानंद यांनी हिंदू पताका सात समुद्रापार फडकवली असे मनोगत विद्यार्थ्यां समोर सादर केले.

तर अध्यक्षीय मनोगत सतीश राठोड यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून विद्यार्थ्यांनी धडे घ्यावे व आपणही आपले जीवन त्यांच्या समान कर्तृत्वाने
फुलवावे असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघरक्षित तावाडे तर आभार प्रदर्शन संतोष इंद्राळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश गायकवाड, बालाजी चव्हाण,विलास पेंदोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये