ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भोई समाजाचे शिष्टमंडळ भेटले अजित दादाला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         दि. ०७ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उबाठा) भद्रावती तालुका प्रमुख तथा भोई समाजाचे युवा नेते नंदुभाऊ पढाल यांचे नेतृत्वात भोई समाजाच्या विविध मागण्या घेऊन भोई समाजाचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विजयगड या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन अजितदादा यांच्याशी चर्चा करण्यात आली. सोबतच भोई समाजाच्या तसेच मच्छीमार सहकारी संस्थेच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.

    या प्रसंगी विधान परिषद आमदार अमोल मिटकरी व अविनाश काकडे उपस्थित होते. ही चर्चा सकारात्मक झाली असून आपल्या मागण्या रास्त असल्याचे अजितदादांनी मान्य केले. भोई समाजाच्या शिष्ठमंडळात नरेंद्र पढाल नगरसेवक भद्रावती, अशोक पडगिलवार चंद्रपूर, युवराज नागपुरे नागपूर, प्रमोद हजारे वर्धा, सुरेश शिवरकर नागपूर, राहुल पढाल गडचिरोली व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये