ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या देवांशुची जागतिक मंचावर झेप

गोव्यातील इंटरनॅशनल पर्पल फेस्टमध्ये सादरीकरण

चांदा ब्लास्ट

अगदी विपरीत परिस्थितीतून पुढे येत कला क्षेत्रात हळू हळू आपले पाय रोवणारा चंद्रपुरातील दिव्यांग विद्यार्थी जागतिक मंचावर पोचला आहे. जागतिक व्यासपीठावर आपल्या कलेचे सादरीकरण करत त्याने चंद्रपूरचे नाव उंचावले आहे.

जागतीक स्तरावरील कलावंतांसाठी गोवा येथे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 चे भव्य आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्राचा मानाचा तुरा म्हणून पुणे येथील ‘बाल कल्याण संस्था‘ येथील दिव्यांग कलावंतांची ‘सनई चौघडा’ सादरीकरणासाठी निवड झाली. यात चंद्रपूरचा दिव्यांग कलावंत देवांशु शिंगरू याच्यासह संजीव हेबळे, हिमेश हबका, प्रकाश माळी, साकेत देवाचाके, अथांग भंडारे या दिव्यांग कलावंतांचा सहभाग होता.

चंद्रपुरातील राकेश आणि मेघना शिंगरू या दाम्पत्याचा मुलगा असलेला देवांशू दिव्यांग आहे. त्याला पूर्वीपासूनच वादनाची आवड आहे. त्याच्या पालकांनी ही आवड हेरून त्याला पुणे येथील बाल कल्याण संस्थेत प्रवेश दिला. तेथून देवांशुच्या केलेला खरा आकार मिळाला. अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम त्याने गाजविले. मागील वर्षी देवांशु आणि त्याच्या बाल कल्याण संस्थेतील अन्य कलावंतांना ‘गंध फुलांचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले होते.

त्याच देवांशुने आता गोव्यातील जागतिक मंचावर सादरीकरण करून देश विदेशातील श्रोत्यांची वाहवा मिळविली  या कलावंतांचा सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे . देवांशुचे गुरू बालकल्याण संस्था पुणेचे दत्तात्रय भावे आणि त्यांचे सुपुत्र ऋषिकेश भावे यांचे
त्यांना मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये