ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपघात व सुरक्षितता या विषयी जागृत करण्यासाठी सुरक्षितता मोहिम

एस.टी. महामंडळाकडुन दरवर्षी जानेवारी महिण्यात केली जाते जागृती

चांदा ब्लास्ट

गेल्या ७५ वर्षापासुन गाव खेडया पासुन मोठया शहरापर्यंत अविरत सुरक्षित प्रवाशी सेवा देत आहे. एस.टी. महामंडळाकडुन दर वर्षी जानेवारी महिण्यात चालक-वाहक- यांत्रिक कर्मचा-यांना अपघात व सुरक्षितता या विषयी जागृत करण्याविषयी सुरक्षितता मोहिम राबविली जाते.

दि. ११/०१/२०२४ रोजी चंद्रपुर विभागाच्या विभाग नियंत्रक सौ. स्मिता सुतवने यांचे अध्यक्षतेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री. आनंद मेश्राम यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन मोहीमेचे उद्घाटन चंद्रपुर विभागाच्या वतीने चंद्रपुर बस स्थानकावर करण्यात आले. सदर कार्यक्रमास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मा.श्री. राजेश मुळे साहेब, सहाय्यक पोलिस निरिक्षक मा. श्री. स्वप्नील गोपाले, रा.प. चंद्रपुर विभागाचे विभागीय वाहतुक अधिकारी मा. श्री. पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतुक अधिक्षक श्री. अशोक गोमासे, चंद्रपुर आगार व्यवस्थापक श्री. प्रितिश रामटेके, बसस्थानक प्रमुख हेमंत गोवर्धन, कार्यशाळा अधिक्षक मनोज डोंगरकर व रा.प. चे चालक-वाहक- यांत्रिक व कर्मचारी तसेच प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी रस्ते अपघात व सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करतांना एस.टी. ची सेवा सुरक्षित असल्याचे आवाहन करीत प्रवाशांचा एस.टी. वर असलेला विश्वास वाढत असुन या पुढेही सुरक्षितेवर भर देउन महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास दृढ करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वाहतुक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे यांनी केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन सहाय्यक वाहतुक निरिक्षक श्री. किरण नागापूरे यांनी व आभर प्रदर्शन आगार व्यवस्थापक श्री. प्रितिश रामटेके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये