ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस. टी. वाहकाचा माणुसकी पणा! पैसिंजरचे बसमध्ये पडलेले मोबाईल केले परत…

नागपूर येथील मोबाईल धारक चंदू ढोके ने st वाहक निषाद शेख यांचे मानले आभार

चांदा ब्लास्ट

        काल रात्री जाम वरून नागपूर साठी नागपूर येथील राहणारे चंदू ढोके हे राजुरा आगाराची राजुरा नागपूर बस क्र. ३६९५ मध्ये नागपूर जाण्या साठी बसले, नागपूर आल्या नंतर ढोके यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बस मध्ये पडला. बस मधून उतरल्या नंतर ढोके आपल्या घरी निघून गेले, मात्र मोबाईल जवळ न दिसल्याने चंदू ढोके यांनी पुन्हा बस स्थानक गाठले मात्र बस दिसली नाही, मात्र सकाळी राजुरा डेपो येथे फोन लावून माहिती देण्यात आली, आणी मोबाईल च्या रिंगरिंग सुरू झाल्या अश्यातच राजुरा – नागपूर बस क्रमांक ३६५९ चे वाहक निषाद शेख यांनी चंद्रपूर येथे मोबाईल चंदू ढोके यांच्या मित्राच्या सुपूर्द केले.

मोबाईल मिळाल्या मुळे चंदू ढोके यांनी वाहक निषाद शेख, राजुरा आगार चे नरेंद्र लवणे यांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये