चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

चळवळीतील कार्यकर्त्यांची सामाजिक बांधिलकी जोपासत “जयंती” चित्रपट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड

चित्रपटातील मुख्य नायकाची ऋतुराज वानखेडे ( सत्या ) ची ब्रम्हपुरी येथील चित्रपट गृहास सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी नंदु गुद्देवार

– समाजातील जाती जमातीतील भेदभाब व समाजात चालणाऱ्या रुढी परंपरा याना बगल देत जयंती चित्रपटाची निर्मिती करून तो चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तो चित्रपट ब्रम्हपुरीतील परक्षकांनी बघावा या साठी विवेक रामटेके, निखिल राऊत यांनी काही मित्रांबरोबर व डॉ जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली
मा.डॉ देवेश कांबळे, मा.जितुभाऊ शेंडे,मा. विपीन नगराळे,मा.चंदन नगराळे, मा.मोंटूभाऊ पिल्लारे , मा.अनुकूल शेंडे या सामाजिक वैचारिक मंडळीनी अर्थ साहाय्य करून हा सिनेमा ब्रह्मपुरी व आजुबाजूच्या गावातील येथील विद्यार्थी, प्रोढ , सामाजिक कार्यकर्ते यांना दुपारी व संध्याकाळी शनिवारी व रविवारी ला अलंकार सिनेमा येथे दाखवला .
या करिता निखिल राऊत व विवेक रामटेके यांचे योगदान अधिक लाभले त्यांनी प्रायोजक लोकांना एकत्र आणून त्यांना आपले विचार मत पटवून सांगितले व त्यांनी लगेच होकार दिला.जाहिरात करण्यापासून तर
पासेस.वाटप पासून पर्यंत आणि सिनेमागृहात आलेल्या प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली
यावेळी रविवारला सायंकाळी जयंती चित्रपटाची टिम व मुख्य नायक(संत्या) ऋतुराज वानखेडे स्वतः उपस्थित राहुन प्रेक्षकांची मन जिंकली व त्यांनी सांगितले की चित्रपट नाही तर शिवराय व भिमराव यांचा विचार समाजात पोहचवा असे सांगितले
सर्वांनी हा चित्रपट बघावा यातून तरूणांना उर्जा व प्रोत्साहन देण्यारा व प्रेरणादायक
ठरत आहे दूर वरून शहरी व ग्रामीण भागातील लोक गर्दी करत आहेत महापुरुषांच्या विचार लोकांपर्यंत पोहोचावा या साठी चित्रपट नक्की बघण्याचे आव्हान या कार्यकर्त्यांनी केले आहे

या करिता विवेक रामटेके निखिल राऊत सर डॉ.जिवने सर ,नरेश भाऊ रामटेके ,जगदीश गोमिला सर विक्की शेंडे, किरण मेश्राम, अभिजित कोसे, राजेश माटे , आतीश झाडे यांनी सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button