ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी कलागुणांसोबत समाजभान जपावे – आ. जोरगेवार यांचे प्रतिपादन

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर येथे तिन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला – गुण असतात त्यांना फक्त आवश्यकता असते ती योग्य संधीची. हि संधी महाविद्यालयात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मिळते. या माध्यमातून विद्यार्थी आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करु शकतो. सोबतच विद्यार्थ्यांनी कलागुणांसोबत समाजभान जपावे असे प्रतिपादन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व सर्वोदय शिक्षण मंडळाचे पदाधीकारी श्री किशोर जोरगेवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी  केले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना श्रीमती मृणालिनी खाडिलकर – गंगशेट्टीवार, अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ जयश्री कापसे, उपप्राचार्य प्रा नरेंद्र टिकले, सांस्कृतिक विभाग समन्व्यक डॉ ममता ठाकुरवार, प्रा संतोष आड़े, सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधि स्वप्निल मेश्राम आणि निखिल भडके उपस्थित होते.
दिनांक २८, २९ आणि ३० डिसेंबर रोजी सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर येथे तिन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन  ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कक्कड यांनी केले . या महोत्सवात रांगोळी, निबंध, पोस्टर, काव्य, वाद विवाद, एकल, युगल व समूह गीत गायन, एकल व समूह नृत्य स्पर्धा, वेशभूषा, पथनाट्य, प्रश्नमंजुषा, फोटो ग्राफी, एकपात्री प्रयोग स्पर्धा द्वारा विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले .या दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव स्व. बाबासाहेब निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा पार पडली. ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त युवावर्गाचे आदर्श ॲड. दीपक चटप  व समाजकार्यकर्ता अविनाश पोईनकर यांनी शिक्षण यात्रा उपक्रमाची माहीती देत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या भविष्याच्या संधी आणि करावे लागणारे प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी वैशीष्ट्यपूर्ण विद्यार्थी स्वप्नील मेश्राम, प्रेम जरपोतदार, निखिल भडके, भूषण ढवळे आणि साक्षी अतकरे यांचा सन्मान करण्यात आला समारोप समारंभाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा नरेंद्र टिकले यांनी तर संचालन प्रा विश्वनाथ राठोड यांनी तर आभार डॉ ममता ठाकुरवार यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी. व सांस्कृतिक समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये