ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पतंग उडवा…. पण विजवाहिन्यांपासून…जीव सांभाळून…जीव… वाचवून

चांदा ब्लास्ट

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठयापर्यत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळता येत नाही मात्र शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहीन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अश्यावेळी काहीजण तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा पयत्न करतात. अश्याप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते त्यामुळे अडकलेला पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर उठू शकतो. असा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचा भिषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढतांना एका तारेवर दुस¬या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कीट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो. सद्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाहीत तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहीत्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहीत होऊन प्राणांतिक अपघाताची दाट शक्यता आहे. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये )याकरिता पतंग उडवितांना पुरेपूर सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

 जीव ही लाखमोलाची देणगी असून सुरक्षेच्या माध्यमातून अपघातापासून बचाव करता येणे शक्य आहे. आहे.

हे लक्षात ठेवा….

१. वीज तारांवार अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.

२. तारामध्ये अडकलेला मांजा ओढू नये. धातू मिश्रित मांजा विजेचा सुवाहक असतो त्यामुळे धातूमित्रीत मान्जा वापरू नये.

३. वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.

४. तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.

५. पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष दयावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये