ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली – बोथली मार्गावर अपघात

दूचाकी स्वार जागीच ठार ; तीन दिवसात दोन मृत्यु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

रस्त्यावर पडलेली चूरी गिट्टी देत आहे अपघाताला आमंत्रन 

सावली तालुक्यातील सावली ते बोथली या मार्गावरील मालपिरंजीच्या समोरील रस्त्यावर एका झुडपात दुचाकी व एक युवक पडल्याची माहिती काही जणांनी सावली पोलिसांना दिली त्यावरून सावली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर युवकाला सावलीतील ग्रामिण रुग्णालयात उच्चस्तरीय चौकशीसाठी पाठवलेले आहे.

दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने सदर गाडी ही कुठून कुठे जात होती व अपघात कसा झाला? या संदर्भात कसलीही माहिती नाही मात्र अपघात हा अंदाजे रात्रौच्या सुमारास झाला असावा,असा संशय ही व्यक्त केल्या जात आहे. आणि झुडुपात असल्याने तो कुणाच्या ही निदर्शनास आलेला नव्हता.मृत व्यक्ती नाव बंडू उबाटे (वय ३२) जिल्हा बुलढाणा असे असून MH 28 NB 8871 होंडा शाईन या कंपनीची गाडी त्या घटनास्थळी आढळून आलेली आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्याच मार्गावर बोथली येथील एका युवकाचा अपघाती मृत्यु झाला होता ही घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली.

सध्या या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे या प्रकरणांचा तपास सावली पोलीस करीत आहे.

सावली – बोथली मार्गावर रोज कुठला ना कुठला किरकोळ अपघात होतच असतात त्यातच हे दोन मोठे अपघात झाले आहेत. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे त्याचे कारण रस्त्यावर उखडून निघालेली चुरी गीट्टी कारणीभूत ठरत आहे.हे गांभीर्य लक्षात घेता सावली बोथली रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये