ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिट अँड रन कायद्याविरोधात जय संघर्ष चालक – मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको

ब्रम्हपुरी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात चक्का जाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रम्हपुरी येथल प्रिय दर्शनी इंदिरा गांधी चौक येथे हिट अँड रन कायद्याविरोधात आज जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने आज १२ वाजता रास्ता रोको करण्यात आला.

     अपघात घडल्यास मृत्यूच्या ठिकाणी सोडून पळून जाणे हे माणुसकीला पटण्यासारखे नाही, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडून जाणे हे नैसर्गिक क्रिया आहे, परंतु कायद्याचे कठोर संरक्षण चालकाला नसल्याने घटना ठिकाणावरून पळून जाणे हे स्वाभाविक आहे त्याकरिता चालक सुरक्षा कायद्याची सुरुवातीला अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर या नवीन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करण्यात यावा यासाठी ब्रम्हपुरी येथील प्रिय दर्शनी इंदिरा गांधी चौक येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. सरकारने लागू केलेला हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा ही मागणी धरून रास्ता रोको करण्यात आला जर हा कायदा रद्द केल्यास येणाऱ्या दिवसात देशाचे चित्र बदललेले दिसेल.या कायद्याच्या विरोधात चालक-मालक संघटना वेगळी भूमिका घेईल आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

 यावेळी शेकडो वाहन चालक मालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये