ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार धानोरकर यांच्या हस्ते शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे विमोचन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा चंद्रपुरच्या सन २०२४ या दिनदर्शिकेचे विमोचन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ ला चंद्रपूर येथे झाले.

या वेळी परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर, विभाग कार्यवाह विलास बोबडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमोल देठे, कार्यवाह विलास खाडे, कोषाध्यक्ष अजय बेदरे, कार्याध्यक्ष विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, संघटनमंत्री सुशांत मुनगंटीवार, उपाध्यक्ष सतीश दुवावार, जिल्हा प्रतिनिधी सतीश डांगरे, आनंदराव वेलादी, सुनील टोंगे सेवानिवृत्त प्रतिनिधी विजय नळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देठे जिल्हाध्यक्ष यांनी केले.आभारप्रदर्शन विजयालक्ष्मी पुरेड्डीवार जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले.

प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह विलास खाडे यांनी केले.
दिनदर्शिका विमोचन प्रसंगी आमदार धानोरकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न शासनस्तरावर मांडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक ने दिलेल्या समस्या/मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले आहे.

राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी याप्रसंगी शिक्षक परिषद करीत असलेल्या कामांबाबत माहिती देऊन दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यामागचा उद्देश सांगितला.भविष्यात शासनस्तरावर प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मांडण्याचा आशावाद याप्रसंगी व्यक्त केला.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक परिषदेची दिनदर्शिका तालुका शाखेकडून प्राप्त करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक ने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये