ताज्या घडामोडी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस शाखेचा मद्यपींना इशारा – मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास होणार कारवाई

जिल्ह्यात सर्वत्र लावणार नाकेबंदी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरूणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभिर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्याच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी पासुन ते दिनांक 31/12/2023 पर्यंत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी, याबाबत चंद्रपूर पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये