ताज्या घडामोडी

रेती तस्करी करणाऱ्या हायवा ट्रक व ट्रॅक्टरवर भद्रावती महसुल विभागाची कारवाई

जेना व माजरी परिसरात चालू होता रेतीचा गोरख धंदा

चांदा ब्लास्ट/

अतुल कोल्हे भद्रावती :-

रात्रीचा फायदा घेत रेतिची अवैध तस्करी करीत असलेला एक हायवा ट्रक व एक ट्रैक्टर भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खणीज पथकाव्दारे पकडण्यात आले.सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात गौण खणीज पथकाने दिनांक 23रोज शनिवार रात्री एक वाजता नंतर तालुक्यातील जेना तथा माजरी परिसरात केली. हायवा ट्रक महसुल विभागाने आपल्या ताब्यात घेतला असुन त्यावरील कारवाई सुरु केली आहे.या घटनेत जवळपास लाख रुपयांच्या वर दंड आकारण्यात येईल असा अंदाज आहे.त्यानंतर पाटाळा नदिघाटावरुन रेतिची तस्करी करीत असलेल्या एका ट्रैक्टरवर कारवाई करण्यात आली. सदर ट्रैक्टरला माजरी पोलीसात जमा करण्यात आले आहे.या घटनेची पुढील कारवाई तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी, अनिल दडमल, चिकटे पटवारी मस्के, पवार, लोंढे पटवारी आदिंनी केली. सदर रेतिघाटांचा अद्याप लिलाव झाला नसल्याने या घाटासोबतच तालुक्यातील अन्यत्र अवैध रेतिव्यवसायाला जोर पकडला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये