Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुद्राभिषेक पूजा, महाचंडी यज्ञ असे केल्याने भगवान शिव सर्वांना सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देतात – आ. धानोरकर

माजरीच्या पर्वतेश्वर शिव मंदिरात रुद्राभिषेक व महाचंडी यज्ञ पूजा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           रुद्राभिषेक पूजा, महाचंडी यज्ञ असे केल्याने भगवान शिव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात तसेच दीर्घायुष्य व सुख-समृद्धी प्रदान करतात असे मनोगत वरोरा भद्रावती परिसराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आरती पूजनाच्या वेळी व्यक्त केले.

        गेल्या तीन वर्षांपासून माजरी संकुलात कोरोनाची दहशत, कधी शहरात पुराची दहशत, कधी वाघाची दहशत तर कधी माजरी येथील रेल्वे स्थानकातील घरांची तोड़फोड़ किंवा विजेच्या समस्येने माजरी करांचे जनजीवन विस्कळीत केले होते. अनेक माजरीवासीयांची अडचण, त्यामुळेच सुख समृद्धी व आनंदासाठी माजरी येथील पर्वतेश्वर शिव मंदिरात रुद्राभिषेक व महाचंडी यज्ञ पूजा करण्यात आली.

       काँग्रेस कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सतीश कुदुदुला यांच्या नेतृत्वाखाली व माजरी ग्रामपंचायत सदस्या स्वप्ना सतीश कुदुदुला यांच्या विशेष सहकार्याने कु.सरिता कुदुदुला यांनी दि. 16 डिसेंबर 2023 शनिवार रोजी सकाळी 8 ते 2 या वेळेत पर्वतेश्वर शिव येथे माजरी उपक्षेत्र कार्यालयासमोरील मंदिरात रुद्राभिषेक व महाचंडी यगन पूजेचे यशस्वी आयोजन केले असून माजरी येथील सर्व रहिवाशांना आयुष्यभर सुख, समृद्धी, उपभोग, सौभाग्य, दीर्घायुष्य, आरोग्य, संपत्ती आणि धान्य मिळावे यासाठी ही पूजा करण्यात आली आहे. दिवाकर पांडे व पाच पंडितांनी वेदमंत्रांनी पूजा केली. या महत्वाच्या पूजेत रुद्राभिषेक व महाचंडी यज्ञ पूजा माजरी निवासी भाविकांनी मोठ्या थाटामाटात संपन्न केली. काँग्रेसचे कष्टाळू कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश कुदुदुला व सरिता कुदुदुला हिच्या मदतीने या यशस्वी पुजेचे आयोजन केले होते.

       प्रमुख पाहुण्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शिवमंदिरात शंकराची आरती करण्यात आली.

      या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार प्रतिभा धानोरकर, माजी जिल्हा सदस्य प्रवीण सूर, माजी पंचायत समिति सदस्य चिंतामण आत्राम, संजय पोडे, माजी ग्राम पंचायत सदस्या साध्याताई पोडे, सरिता नगराले, रवी भोगे ग्राम पंचायत सदस्य, शिवसेना प्रमुख माजरी रवि राय, ग्राम पंचायत सदस्य व तालुका सचिव काँग्रेसचे राकेश दोंतवार, माजी सरपंच बंडू वनकर, रामा रेड्डी, लखी (सोनी) सोनार, बंडा श्रीनिवास, रवी श्रीवास्तव, टोनी (डांसर) गडप्पेल्लीवार. बबलू राय आदी उपस्थित होते. रुद्राभिषेक व महाचंडी यज्ञ पूजनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये