Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या अपघातात एक जखमी एक ठार

ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होऊन दोन जखमी तर एक ठार झाल्याची घटना दि.18 डिसेंबर ला घडली.

ब्रम्हपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 18 डिसेंबर ला चिंचोली फाटा ते चिखलगाव रोड दरम्यान सायंकाळी 5.15 च्या दरम्यान कु.कशीस नवनाथ दुपारे(14) व तिची मैत्रीण दोघ्याही सायकल ने स्वागवी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारसायकल क्र.एम एच 34 ए 4031 ने सायकल ला टक्कर दिल्याने सायकल वरील कु.कशीस व तिची मैत्रीण खाली पडून गंभीर जखमी झाले असून जखमींना ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आले. तर नागपूर गडाचोरोली मार्गावर ब्रम्हपुरी टोल नाक्याजवळ खराबी येथील मैथिली जयदेव धोंगडे (23) ही ब्रह्मपुरी येथून दि.18 डिसेंबर ला सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान खराबी फाट्यावरून वळण घेत असताना नागभीड वरून ब्रम्हपुरीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात मोटरसायकर वाहनाने मैथिलीच्या सायकल ला जबर धडक दिल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला व रक्तपात झाला त्यामुळे तिला ब्रम्हपुरी येथील आस्था हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सदर घटनेने खराबी गावात शोककळा पसरली असून सदर घटनांचा तपास ब्रम्हपुरी पो.स्टे. चे ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये