ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूरच्या दिपाली आणि अंजली राठोड यांना लातूरात सन्मान कर्तृत्वाचा, पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

लातूर येथील दयानंद सभागृहात लायन्स क्लब लातूर सिटीच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार सोहळा 23 मे रोजी संपन्न झाला. याप्रसंगी नागपूर येथील दिपाली श्रीपत राठोड आणि अंजली श्रीपत राठोड या दोघी बहिणींचा माननीय भारत बाष्टेवाड जिल्हाधिकारी, लातूर आणि माननीय अमोल तांबे, जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने त्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब लातूर सिटीचे अध्यक्ष मा.नागनाथ गिते होते तर प्रमुख वक्ते निर्भिड,सडेतोड,परखड सत्यनिष्ठ मा.विलासजी बडे,सहा.संपादक,न्यूज १८ मराठी यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांचे वडील श्रीपत राठोड आणि आई जयश्रीताई राठोड हे दोघेही उपस्थित होते. म्हणतात ना गडगंज श्रीमंती पेक्षा गुणवान संतती केव्हाही श्रेष्ठ असते.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरच्या दीपाली आणि अंजली राठोड या दोघी बहिणीने आपल्या आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन आपल्या स्वतःच्या घराच्या छतावर वसंतराव नाईक परसबाग निर्माण केलेली आहे. ही परसबाग पूर्णतः जैविक पद्धतीने विकसित केलेली आहे या परसबागेत फळझाडे,फुलझाडे, वेली, फळभाज्या,पालेभाज्या, औषधी वनस्पती,आणि वेगवेगळ्या प्रजातीचे एकूण 90 प्रकारच्या वनस्पतींचे 700 पेक्षा जास्त झाडे लावून एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.ही परसबाग पाहण्यासाठी देशभरातून अनेक मान्यवरांनी भेटी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून विविध ठिकाणी त्यांचा गौरव केलेला आहे.

     बंजारा समाज भूषण कु.दिपाली आणि कु.अंजली राठोड या बंजारा समाजाच्या मुलींना सन्मान कर्तृत्वाचा हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करताना अनेक समाज बांधव उपस्थित होते.

यानिमित्ताने लातूर जिल्हयातील बंजारा समाजाच्या वतीने या प्रसंगी गोर सीकवाडी व गोर सेनेच्या वतीने दिपाली आणि अंजली राठोड तसेच त्यांच्या आई वडीलांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक,चळवळीचे मार्गदर्शक,बंजारा समाजातील लेखक,मार्गदर्शक मा.बळीराम जाधव लिखित अनमोल ग्रंथ गोरमाटी भाषा शब्दकोश त्यांच्या द्वारा कु.दिपाली व कु. अंजली राठोड यांना भेट देण्यात आले.

  या प्रसंगी मा.बळीराम जाधव राष्ट्रीय साहित्य दळ प्रमुख ,मा .डॉ .राम पवार ,मा.अर्जून राठोड,मा.प्रसाद पवार,मा.संदीप चव्हाण,मा.उद्धव चव्हाण,मा.बालाजी राठोड,कु.वैष्णवी चव्हाण हे उपस्थित होते.

याशिवाय लातूर शहरात विविध मान्यवर आणि संस्थेकडून अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.समाजबांधवात त्यांनी करत असलेल्या उपयोगी आरोग्यदायी उपक्रमाची विशेष चर्चा झाली. लातूरच्या कार्यक्रमानिमित्य सामाजिक कार्यकर्ते मा.संजय राजुळे,शेख परवीन,शेख दिलावर आणि परमेश्वर शिंदे यांनीही विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये