त्या वर्ग मित्रांच्या नातेवाईकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
पंढरीकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदानासोबतच केले वस्त्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा या विद्यालयातील सन 1982/83 बॅच च्या वर्ग मित्रांनी एकत्रित येत शहरात व तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे गरजूंना सहाय्य हा उद्देश समोर ठेवण्यात आलेला आहे शहरात दिनांक 11 जुलै 26 रोजी मराठवाड्यातील वरुड येथून निघालेल्या जय बजरंग पायी दिंडीतील वारकऱ्यांचा मुक्काम होता याप्रसंगी या वर्ग मित्रांच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी नियोजन केले व बायपासवरील श्रावनी लॉस मध्ये सहभागी वारकऱ्यांना अन्नदान करून वश्रदान सुद्धा केले यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाड्यातील वरुड येथील जय बजरंग ट्रॅव्हल्स चे मालक ह.भ.प. सुधाकर करडीले हे गेल्या तीन वर्षापासून स्वखर्चाने श्री विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीचे नियोजन करतात दिंडीत सहभागी सर्व भक्तांची काळजी घेत त्यांना परत येई पर्यंत सर्व खर्च स्वतः करतात 11 जुलै 26 रोजी सदर दिंडी शहरात आल्यानंतर वर्गमित्र प्रद्युम्न तेलंग यांच्या मातोश्री श्रीमती वसुंधरा तेलंग यांनी सहभागी महिलांना वस्त्रदान करण्याची संकल्पना मांडली त्यास लगेच इतरही नातेवाईकांनी सहमती दर्शवली व केवळ दहा मिनिटात 51 महिला वारकऱ्यांसाठी वस्त्रांची तयारी पूर्ण करण्यात आली व सायंकाळी त्या वारकऱ्यांचा सन्मान करत त्यांना वस्त्र देण्यात आले.
याकरिता देवांग वस्रालयाच्या प्रमुख भावना प्रवीण रोडे यांनी मोलाचे सहकार्य केले तर प्रेरणा प्रद्युम्न तेलंग, तृप्ती हेमंत जिंतूरकर, ज्योती अमोल सुरळीकर, रमा गोपाळ व्यास, मनीषा सुशील हनुमंते, मीनाक्षी नीरज पारिख, कविता अनिल बाहेती, जया सन्मती जैन, उषा सतीश कुलकर्णी, अनिता राधेश्याम भीलवडे, तसेच दानशूर मंगलाताई सुधाकर डोईफोडे, गणेश रामाने, गजानन मुळे, शिवा महाराज शर्मा यांनी मोलाचे सहकार्य केले तर यशा हेमंत जिंतूरकर यांच्याकडून सहभागी महिलांना पायातील मोजे प्रत्येकी दोन जोडे भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हरिपाठ प्रसंगी अनेक वर्ग मित्रांच्या परिवारातील सदस्यांनी फुगड्या खेळून करून आनंद साजरा केला.



