अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही 1 लाख 90 हजारावर मुद्देमाल जप्त
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील दारूबंदी विभागाची उत्कृष्ट कामगिरी...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची धडक कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन आरोपी नामे 1) अरवींदा नैनमुल्ला काळे वय 40 वर्ष रा. पारधीबेडा पांढरकवडा ता.जी. वर्धा आरोपी क्र 2) सागर ज्ञानेश्वर जयस्वाल वय 29 वर्ष रा. गोंडप्लॉट, वर्धा ता.जी. वर्धा हे दोन्ही आरोपी हे आपले ताब्यातील मोटारसायकलने गावठी मोहा दारूचा माल घेवुन दारुची अवैध्यरित्या वाहतुक करणार आहे अशा प्राप्त खबरेवरुन दोन्ही नमुद आरोपीवर पंच व पो स्टॉफचे मदतीने पांढरकवडा ते गणेशपुर रोडवर गणेशपुर गावात ग्रामपंचायत समोर नाकेबंदी करुन प्रो रेड केला असता नमुद आरोपी क्रमांक 01 चे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती पांढ-या रंगाचे होंडा कंपनीचे एव्हीएटर दुचाकी क्र MH-32-AN-3269 ची किंमत 80000/- रू 2) 01 प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 28 लीटर गावठी मोहा दारु व मागील डीक्कीत एका प्लॉस्टीक पन्नीत अंदाजे 14 लीटर गावठी मोहा दारु अशी एकुण 42 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रू प्रमाणे 8400/- रू चा माल असा एकुण जु.की 88400/- रू चा मुद्देमाल मुद्देमाल आरोपी क्रमांक 02 चे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती काळ्या रंगाचे हीरो होंडा कंपनीची सी.डी. डॉन दुचाकी क्र MH-32-L-5382 ची किंमत 80000/- रू 2) 04 प्लॉस्टीकचे डबकीत प्रती डबकी अंदाजे 28 लीटर प्रमाणे एकुण 112 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रू प्रमाणे 22400/- रू चा माल असा एकुण जु. की 102400/- रू चा मुद्देमाल असा दोन्ही आरोपीचे ताब्यातुन एकुण जु की 190800/-रुपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद दोन्ही आरोपी 1) अरवींदा नैनमुल्ला काळे वय 40 वर्ष रा. पारधीबेडा पांढरकवडा ता.जी. वर्धा आरोपी क्र 2) सागर ज्ञानेश्वर जयस्वाल वय 29 वर्ष रा. गोंडप्लॉट, वर्धा ता.जी. वर्धा ता.जी.वर्धा यांचे विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. सुनील महाडीक यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक विनोद गिरी, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम ब न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.



