ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धा – २०२६’चे आयोजन

विकासाची प्रेरणादायी कथा कॅमेऱ्यातून मांडण्याची सुवर्णसंधी; राज्यभरातील सर्जनशील युवकांना सहभागाचे आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ समाजातील सकारात्मक परिवर्तन, विकासकामांची माहिती आणि लोकजागृतीचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दृकश्राव्य माध्यम हे आजचे सर्वात प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त एस. के. फिल्म प्रॉडक्शन, चंद्रपूर यांच्या वतीने ‘उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धा – २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील नवोदित चित्रपट निर्माते, व्हिडिओ क्रिएटर्स, विद्यार्थी, छायाचित्रकार, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स तसेच सर्जनशीलतेची आवड असलेल्या प्रत्येक नागरिकाला समाजहिताचे विषय प्रभावी आणि कल्पक पद्धतीने मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात शिक्षण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती, सांस्कृतिक जतन, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाच्या विविध उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. विकासाभिमुख विचार समाजापर्यंत पोहोचावेत, सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा निर्माण व्हावी आणि सर्जनशील युवकांना आपल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास, जलसंवर्धन, रोजगारनिर्मिती, संस्कृती, महिला सक्षमीकरण, युवा विकास, सामाजिक परिवर्तन, स्वच्छता, लोकसहभाग आणि समाजविकास अशा विविध विषयांवर आधारित शॉर्ट फिल्म किंवा रील सादर करता येणार आहे. सहभागी स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेच्या माध्यमातून विकासाची प्रेरणादायी कथा मांडत समाजात सकारात्मक विचारांचा संदेश रुजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील गुणवंत आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

प्रथम पारितोषिक : ₹१५,०००

द्वितीय पारितोषिक : ₹१०,०००

तृतीय पारितोषिक : ₹७,०००

याशिवाय उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या निवडक स्पर्धकांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी शॉर्ट फिल्म किंवा रील सादर करण्याची अंतिम मुदत २० जुलै २०२६ असून इच्छुक स्पर्धकांनी Google Form द्वारे ऑनलाइन नोंदणी करून आपली कलाकृती सादर करावी. स्पर्धेचे नियम, अटी व इतर आवश्यक माहिती Google Form मध्ये उपलब्ध आहे.

Google Form लिंक :

https://forms.gle/fh8M135A7gpF1HoNA

“चला… आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेतून विकासाची प्रेरणादायी गोष्ट जगासमोर मांडूया. सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन एस. के. फिल्म प्रॉडक्शन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

देवा बुरडकर

📞 ९६३७९५७९८८ / ७९७२२५१२८९

– एस. के. फिल्म

प्रॉडक्शन, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये