ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे आयोजन व उद्धाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

     आज दिनांक ११ डिसेंबर २०२३ ला उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मंच्यावर उपस्थित डा विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे सा. अधीसेविक उपस्थित होते. प्रास्ताविक कोल्हे यांनी केले. डॉ.विरूडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सिकलसेल आजाराची माहिती दिली. आजार कसा होतो, काय करायला पाहिजे इत्यादि विषयी माहिती दिली.

   वंदना विनोद बरडे यांनी उपाययोजना सांगितली. जीवनशैली बद्दल मार्गदर्शन केले. उदाहरणादाखल समजाऊन सांगितले. त्याचा प्रचार व प्रसार करण्यास सांगितलं.

   सिकलसेल ग्रस्त रुग्णाचे मनोगत घेतले. शाळकरी मुलांसोबत चर्चा केली. मुलांनी, मुलींनी उत्स्पूर्त सहभाग नोंदविला

     आभारप्रदर्शन पुनम यांनी केले. या सप्ताहामध्ये शाळकरी मुलांचे सिक्लसेल तपासणी करून त्याच्या माहितीचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये