ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा कारागृह येथे ‘मानवी हक्क दिन’ साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांचेकडील आदेशानुसार आज दिनांक १०/१२/२०२३ रोजी वर्धा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे बंदीस्त असलेल्या बंदयांकरीता १० डिसेंबर “मानवी हक्क दिन” हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थीत कार्यक्रमाचे अध्यक्ष, विवेक देशमुख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांनी कारागृहात बंदीस्त असलेल्या बंदयांना मानवी हक्क संरक्षण कायदयाअंतर्गत संपुर्ण माहीती दिली. त्याचप्रमाणे चैतन्य सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अॅड. अनिता ठाकरे यांनी सुध्दा बंदयांना मानवी हक्काबाबत योग्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारागृह अधीक्षक,  नितीन क्षिरसागर यांनी केले.

सदर कार्यक्रमाकरीता मा.  विवेक देशमुख, सदस्य सविच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा. अमोल लगड, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा, श्रीमती अॅड. अनिता ठाकरे, अध्यक्ष, चैत्यन्य सेवाभावी संस्था, वर्धा, नितीन क्षिरसागर, प्रभारी कारागृह अधीक्षक, जितेंन्द्र भावसार, तुरुंगाधिकारी, अमित कोटारकर, शिपाई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाचे कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये