ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक परिषदेचे ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चात’ सहभागाचे आवाहन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने येत्या 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे सूरू असलेल्या ‘हिवाळी अधिवेशनात’ माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्वात ‘जुनी पेन्शन’ शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी म्हणून शिक्षक परिषदेचे पेन्शन सदस्य मोठ्या संख्येने जनक्रांति महामोर्चात सहभागी होणार आहेत.

सदर महामोर्चा यशस्वी करण्याकरीता शालेय व महाविद्यालयीन शिक्षकांनी एक दिवसाची किरकोळ रजा घेऊन मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे

नागपूर विभागाचे अध्यक्ष अजय वानखडे व वर्धा जिल्हयाचे कार्याध्यक्ष प्रा. मोहन गुजरकर यांनी केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये