ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदूर: सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदुर येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३९९ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.

त्यांनी आपल्या भाषणातून संताजीच्या कार्याची माहिती सांगितली तसेच संताच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या संताच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कुमारी ज्योती चटप यांनी केले.

प्रास्ताविक नामदेव बावनकर यांनी तर आभार सुषमा शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला सुरेश पाटील, माधुरी उमरे, जी एन बोबडे, भुवनेश्वरी गोपमवार,मांढरे, मरसकोल्हे, आडे, आत्राम,कींनाके मेश्राम, यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, शशिकांत चन्ने, भसारकर, सिताराम पिंपळशेंडे तथा सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये