ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे

श्रीधरराव गोडे ; क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांतील उपजत कलागुनांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे.याच माध्यमातून त्याचा सर्वांगीण विकास होतो असे मत ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे यांनी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना द्वारा संचलित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यक्त केले.

या महोत्सवाचे उद्घघाटन चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाऊराव कारेकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचें, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम कोडापे, माजी पंचायत समिती उपसभापती संभाजी कोवे, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अय्याज अहमद पटेल, सहसचिव प्रा.अरुण कुकडे, ज्येष्ठ संचालक नामदेव जोगी, संचालक गणेश गोडे, अरविंद कारेकर, सुभाष जोगी विलास बोरडे, राजेश्वर जुमनाके, कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबन चे उपसभापती पुंडलिक ठाकरे, वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी बोंडे, सेवानिवृत्त माजी प्राचार्य डी जी खडसे, पर्यवेक्षक के डी घुगुल, नारायण हजारे, प्रा.ज्योती येरावार, संगीता खडसे, पत्रकार मनोज गोरे, जयंत जेनेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना श्रीधरराव गोडे यांनी शाळेच्या निर्मितीपासून आज गायतच्या प्रगतीचा आढावा मांडला. विजयराव बावणे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती त्यांच्यातील विविध उपजत कलागुणाना सामोरे आणून प्रयोगशील व कार्यात्मकरित्या साधली पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

यावेळी विद्यालय व महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य डी जी खडसे, सहाय्यक शिक्षक एस व्हि बावणे, पी पी उईके, एल के गायधने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच दहावी बारावी, एन एम एम एस शिष्यवृत्ती पात्र, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक नामदेवराव जोगी यांचा शतकपूर्ती निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वेशभूषा एकल सामूहिक नृत्य गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी बी बोंडे, संचालन गणेश गोडे यांनी केले. तर तर आभार प्रदेशन मने सर यांनी केले यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये