ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन रखडले

वेतनाअभावी आर्थिक बजेट कोलमडले. ; जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांत संतापाची लाट

चांदा ब्लास्ट

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे मार्च २०२४,माहे एप्रिल २०२४ चे मासिक वेतन रखडले असल्याने प्राथमिक शिक्षकांचे पूर्ण आर्थिक बजेट कोलमडले असून जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांत संतापाची लाट पसरली आहे.

शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन एक तारखेला होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणाली अस्तित्वात आणली.परंतु या प्रणालीचा फारसा उपयोग होत नसल्याचे आता दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे मार्च २०२४,माहे एप्रिल २०२४ चे मासिक वेतन तात्काळ करून माहे मे २०२४ पासून मासिक वेतन शासन आदेशानुसार निश्चित तारखेस होण्यासंदर्भाने प्रशासनाने निश्चित धोरण आखण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे केळकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२४ दिले.

शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अमोल देठे, कार्याध्यक्ष विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, कार्यवाह विलास खाडे, कोषाध्यक्ष अजय बेदरे, संगठन मंत्री सुशांत मुनगंटीवार, सतीश दुवावार, आनंदराव वेलादी, सुनील टोंगे, सतीश तन्नीरवार यांचा समावेश होता.

माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन आयकर कपातीत गेले.माहे मार्च २०२४ व माहे एप्रिल २०२४ वेतन अद्यापही झाले नाही. त्याचप्रमाणे कधी होणार याची शाश्वती राहीली नसल्याने प्राथमिक शिक्षकांचे दैनंदिन खर्चावर जादा ताण पडत असून विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मासिक वेतनाअभावी गृहकर्ज/शैक्षणिक कर्ज/वैयक्तिक कर्ज इत्यांदीवर जादा व्याजाचा भुर्दंड पडत आहे. विम्याचे ही हफ्ते यामुळे स्थगित राहत असल्याचे दिसून येत आहे. वेतनाच्या विलंबामुळे कुटुंबातील व्यक्तींवरील आरोग्य खर्चावरील रकमेवर अतिरिक्त जादा ताण पडत असल्याने प्राथमिक शिक्षक हवालदिल झाला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये