ताज्या घडामोडी

दुचाकीच्या भिषण अपघातात युवक जागीच ठार – दुसरा युवक गंभीर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा शहरालगत असलेल्या जोगापुर जंगल मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुचाकीच्या भिषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला असुन दुसरा युवक गंभीर जखमी असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार राजुरा तालुक्यातील वाघोबा साखरी येथिल ज्ञानेश्वर पायपरे व संतोष कावळे हे दोन युवक दुचाकीने वरुर मार्गे राजुरा कडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जोगपुर जंगल परिसरात दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात #ACCIDENT ज्ञानेश्वर पायपरे जागीच ठार झाला तर गंभीर जखमी अवस्थेत संतोष कावळे ह्याला राजुरा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने अखेरीस त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अपघाताची माहिती प्राप्त होताच राजुरा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली असुन पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये