Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक उध्वस्त

तहसीलदार कोरपना यांना निवेदन 25 हजार नुकसान भरपाई द्यावी - उत्तम पेचे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दिनांक 27 नोव्हेंबर व 28 नोव्हेंबर ला सतत दोन दिवस अवकाIळी पाऊस पडल्या मुळे कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभे पीक कापूस तूर मिरची व इतर पिकाचे नुकसान झाले आहे.

त्यांचे तत्काळ पंचेनामे करण्यात यावे व एकरी 25 हजाराची मदत देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी निवेदन देताना उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कोरपना, संभाजी कोवे माजी उपसभापती प. स. कोरपना,  सीताराम कोडापे माजी सदस्य जि प, भाऊराव चव्हान माजी संचालक कृ.उ. कोरपना, सुरेश पा मालेकार ज्येष्ठ नेते, विनोद नवले संचालक कृ ऊ बाजार समिती, संजय जाधव अध्यक्ष भटक्या जाती जमाती कोरपना, रसूल पटेल, घनश्याम नांदेकर माजी अध्यक्ष युवक, काँग्रेस शगीर भाई माजी उपसरपंच रोशन मारापे सरपंच, अनिल गोंडे माजी उपसरपंच, भाऊराव कोल्हे, भाऊराव ठावरी, विठोबा गुरूनुले, कलीम भाई व इतर मान्यवर तहसीलदार यांना निवेदन देताना उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये