अवकाळी पावसामुळे कापूस तूर पिकांचे नुकसान
शेतकरी बांधवाच्या चिंता वाढल्या
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दि. २७ नोव्हेंबर रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे कोरपणा तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या शेतातील कापूस पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे.सध्या कापूस वेचनिचे काम सुरु आहे.कापूस वेचणी साठी मंजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.मंजूर नसल्यामुळे शेते पांढरी दिसत आहे .शेतकऱ्यांचे पांढरे सोने शेतात असल्याने चिंतेत असलेल्या बळीराज्याची अवकाळी पावसामुळे चिंता वाढली आहे .पावसामुळे कापूस लोंबून जमिनीवर पडला असून ओला झालेला आहे.
कोरपणा तालुक्यात कापूस हे मुख्य पिक असून कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवाचे पांढरे सोने घरी कमी शेतात जास्त त्यामुळे अडचणीत शेतकरी आहे.तसेच तूर पिके पावसामुळे जमिनीवर वाकून गेले आहे त्यामुळे बालिराज्याच्या तोंडातील आलेला घास पावसामुळे गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.या अवकाळी पावसामुळे झालेले नुसकान भरून निघत नाही गेल्या अतिवृष्टीं झालेले पिकाचे नुसकानीचे विमा कंपनीने नुसकान दिले नाही त्यातच पुन्हा पावसाने नुस्कान केले आता तरी विमा कंपनी व शासन शेतकऱ्यांना मदत करतील काय अशी आशा कोरपना तालुक्यातील आस धरून आहे.का जगाचा पोशिंदा सदा चिंतेत काय तरी लोकप्रतिनिधी नेत्यांनी आता तरी लक्ष देण्याची गरज आहे.



