ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्याबाबत तडजोड न करता आरोग्यासाठी वेळ काढा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन

चांदा ब्लास्ट

 धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. लहान्या पासून तर मोठ्या पर्यंत आरोग्याची काळजी घेत नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे काळानुसार सर्वानी आरोग्याबाबत तडजोड न करता आरोग्यासाठी वेळ काढण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.  
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे संविधान सन्मान दिन निमित्य बंगाली कॅम्प येथील माता मंदिर चंद्रपूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 
यावेळी चंद्रपूर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते महेश मेंढे,  अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष ऍड. प्रितिषा शहा, चंद्रपूर शहर परिवहन विभाग अध्यक्ष सचिन रामटेके, सुनंदा धोबे, सुनीता धोटे, मुन्ना तावाडे, विश्वजित शहा, पप्पू सिद्धीकी, नौशाद, भालचंद्र दानव, डॉ. राहुल नगराळे, डॉ, रुपाली नगराळे, डॉ. प्रज्वल भोयर, डॉ. मीनाक्षी मिश्रा यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.   
त्यासोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विविध आजारांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तरीसुद्धा गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे स्वतःजवळचा असलेला पैसा खर्च करून खाजगी रुग्णालयात जात असल्याचे निदर्शनास येते. हे चित्र बदलविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करून समर्पक भावनेने सेवा दिली तर लोकांचा ओढा निश्चितच वाढेल. या दृष्टीने आरोग्य विभागाने काम करावे. असे आवाहन देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये