Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवराज मालवी यांचे 5 सुवर्ण पदकासह राज्य स्तरीय खेलो मास्टर्स क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये वर्चस्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्र संलग्नित अमरावती डिस्ट्रिक्ट खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या सहकार्याने डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती महोत्सवा निमित्त राज्य स्तरीय 2 री खेलो मास्टर्स क्रीडा स्पर्धा 2023 चे महाराष्ट्राची क्रीडा व शैक्षणिक नगरी अमरावती येथे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय पंचवटी चौक अमरावती येथे शनिवार दिनांक 25 व रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला आयोजित करण्यात आली होती .ही क्रीडा स्पर्धा वय वर्ष 30 ते 100 वर्ष विविध वयोगटातील पुरुष व महिलां खेळाडूच्या विविध क्रीडा प्रकारासाठी आयोजित केली होती

या क्रीडा स्पर्धेचे कार्यक्रमाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख, अध्यक्ष- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते तर उद्घाटक माननीय खासदार सौ नवनीतजी राणा अमरावती लोकसभा मतदारसंघ व स्वागताध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ इंगोले कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते

या क्रीडा स्पर्धेत एकूण 10 क्रीडा प्रकारांचा समावेश होता .महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन 1000 च्या वर महिला व पुरुष खेळाडू क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले . चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवराज मालवी हे 60 ते 64 या वयोगटातून जलतरण स्पर्धेच्या विविध क्रीडा प्रकारात सहभागी होवून 5 सुवर्ण पदक प्राप्त करीत स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केले.त्यांनी 100 मीटर फ्रिस्टाइल मध्ये सुवर्ण पदक, 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक,200 मीटर फ्रिस्टाइल मध्ये सुवर्ण पदक, तसेच 4 x 50 मीटर फ्रिस्टाइल रिले व 4 x 50 मीटर मिडले रिले मध्ये सुवर्ण पदक असे एकूण 5 सुवर्ण पदक प्राप्त करीत स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केले त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये